मुंबई: भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणे निश्चित आहे. इंग्लंड मालिकेत पहिल्यांदा दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. जेम्स अँडरसन खेळणे निश्चित आहे. याशिवाय इंग्लंड पहिल्यांदा या मालिकेत वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही प्लेईंग ११ चा भाग बनवू शकते. दरम्यान रॉबिन्स खेळल्यास स्पिनर रेहानला बाहेर बसावे लागू शकते.
भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत इंग्लंडच्या संघाने आश्चर्यजनक निर्णय घेताना केवळ एक वेगवान गोलंदाजाला प्लेईंग ११मध्ये ठेवले आहे. आता या रणनीतीला बदलण्याचा विचार करत आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून टॉम हार्टले आणि शोएब बशीर हे खेळणार आहेत. याशिवाय अँडरसन आणि रॉबिन्सन प्लेईंग ११चा भाग असतील. तिसऱ्या स्पिनरची भूमिका ज्यो रूट निभावेल.
पिचची भूमिका महत्त्वाची
इंग्लंड तीन स्पिनर्ससोबत मैदानात न उतरण्याचे आणखी एक कारण म्हणजे पिच. राजकोटची पिच रँक टर्नर नसल्याचे म्हटले जात आहे. राजकोटची पिच अशी असेल जिथे स्पिनर्सशिवाय फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांनाही फायदा मिळेल. यामुळेच इंग्लंड तीनऐवजी दोन स्पिनर्ससह मैदानात उतरेल. जॅक लीच बाहेर गेल्यानंतर त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा झालेली नाही. तर रेहान व्हिसा वादात अडकताना दिसत आहे.