मुंबई: चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि पोषणतत्वे आढळतात. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. भाजलेले चणे शरीरास स्वस्थ राखण्यास मदत करतात. भाजलेल्या चण्यामध्ये प्रोटीनशिवाय फायबर आणि अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. यामुळे याला हेल्दी सुपरफूड म्हटले जाते.
भाजलेले चणे खाल्ल्याने वजन वेगाने कमी होते. तसेच याचे अनेक फायदेही आहेत.
वेट लॉस
वजन कमी करण्यासाठी भाजलेले चणे फायदेशीर ठरतात. यात प्रोटीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. चण्यामधील फायबर आणि प्रोटीन आपली खाण्याची क्रेव्हिंग शांत करत वजन कमी करण्यास मदत करतात.
डायबिटीज
भाजलेले चणे डायबिटीजमध्ये अतिशय फायदेशीर असतात. याच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याचा ग्लायसेमिक इंडेक्ट आणि यातील प्रोटीन डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर असतात.
हृदयाचे आरोग्य चांगले राखते
भाजलेले चणे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यात फायबरचे प्रमाण अधिक असते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे चांगले असते. यामुळे हृदयाचे आजार नियंत्रणात राहतात.
कॅन्सरचा धोका कमी
भाजलेल्या चण्यामध्ये ब्युटी रेट नावाचे फॅटी अॅसिड आढळते. जे कॅन्सरच्या पेशी रोखण्यास मदत करतात. यामुळे भाजलेले चणे कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करतात.
मेंदूसाठी फायदेशीर
भाजलेले चणे अथवा साध्या चण्याच्या सेवनाने मेंदूचा विकास वेगाने होतो. यामुळे ब्रेन पॉवर बूस्ट होते. यातील ल्युटिन आणि दुसरे फायटोन्यूट्रिएंट्स मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.