मुंबई : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरला (Fighter) त्याच्या एड्रेनालाईन एरियल ॲक्शन सीक्वेन्ससाठी चांगला गाजला. जगभरातील एकूण बॉक्स ऑफिसमध्ये जवळपास ३५० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट २०२४ मधील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे.
वीकेंडपासून फायटरने केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांना आकर्षित केले असून ज्यामुळे जगभरात हा चित्रपट सुपरहिट ठरला.
IAF योद्धांचे धैर्य, बलिदान आणि दृढनिश्चय यांना समर्पित फायटर या वीरांच्या उल्लेखनीय कथा आणि त्यांनी संरक्षण केलेल्या आकाशाशी त्यांचे अतूट नाते उलगडते. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अभिनीत, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुद्धा केली. Fighter हे भारतातील पहिले एरियल ॲक्शन ड्रामा आहे जो २०२४ मधील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे.