Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Ashok Chavan : “पीएम मोदींचे काम पाहून मी प्रभावित झालो”

Ashok Chavan : “पीएम मोदींचे काम पाहून मी प्रभावित झालो”

विकासाच्या वाटेवर मलाही चालायचे आहे : अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत काम करत आहेत. त्यांनी जे काम केले आहे ते पाहून मी प्रभावित झालो आहे. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायला पाहिजे. आता पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर मला चालायचे आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे तोंडभरुन कौतुक केले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यानंतर आज त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, विरोधात आणि सत्तेत असतानाही आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. आम्ही नेहमी विकासाला साथ दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला नेहमी सकारात्मकरित्या साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. राज्यात भाजपाला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करेन. मी व्यक्तिगत टीका कोणावर करणार नाही, दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही, ३८ वर्षांनंतर भाजपाच्या माध्यमातून नवीन सुरुवात करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर मला चालायचे आहे. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. म्हणून मी लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. आता पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment