तहसीलदार बंडू कापसे यांचे दोन्ही गटांना शांतता ठेवण्याचे आवाहन
जळगांव : रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन गटात झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असुन तहसीलदार बंडू कापसे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ यावल रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेडी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथील परिस्थिती संपूर्ण माहिती घेतली. गावागावात आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण झाल्या त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे व इतर महसूल अधिकारी त्या ठिकाणी पोहचले आणि तहसीलदारांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.