Thursday, July 18, 2024
HomeदेशBihar Politics : बिहारमध्ये जेडीयू-एनडीएचीच सत्ता! नितीशकुमारांनी सिद्ध केलं बहुमत

Bihar Politics : बिहारमध्ये जेडीयू-एनडीएचीच सत्ता! नितीशकुमारांनी सिद्ध केलं बहुमत

तेजस्वी यादव यांना मोठा झटका

पाटणा : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय जनता दलाची (RJD) साथ सोडत पुन्हा एकदा एनडीएसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यांनी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत (Bihar Legislative Assembly) एनडीए (NDA) सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि नितीश कुमार प्रणीत एनडीए सरकारने विश्वासप्रस्ताव जिंकला. स्पष्ट बहुमत मिळाल्याने बिहारमध्ये नितीशकुमारांच्याच सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकूण २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांच्या संख्याबळाची आवश्यकता होती. नितीश कुमार यांना १२९ आमदारांचे समर्थन मिळाले. विश्वासदर्शक ठरावावेळी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळे एनडीएने १२९ मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांची सत्ता कायम राहणार आहे.

भाजपचे तीन आमदार भागीरथी देवी, रश्मी वर्मा आणि मिश्री लाल हे विधानसभेत आले नव्हते. त्यामुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांना बिहारच्या विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता. त्यांना हटवण्याच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात ११२ मतं पडली. त्यानंतर अध्यक्षांना पदावरुन हटवण्यात आले व बहुमत चाचणीला सुरुवात झाली.

सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा नितीश कुमार यांनी यापूर्वी केला होता. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले होते. दरम्यान, आरजेडीचे तीन आमदार पलटले. आरजेडीचे तीन आमदार नीलम देवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव हे एनडीए आघाडीच्या बाकावर जाऊन बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला चार मते अधिक पडल्याचे दिसले. महागठबंधनला मोठा धक्का बसला आणि नितीश कुमार यांना स्पष्ट बहुमत मिळालं. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -