मुंबई : एकीकडे सर्वसामान्य हिंदू बांधवांचे अतिक्रमण दिसले की लाव बुलडोझर, अशी एकंदरीत महाराष्ट्रातील महापालिका अतिक्रमण विभागाची विदारक परिस्थिती आहे. तर दुसरीकडे मुस्लिम समुदायाच्या अवैध बांधकामावर हातोडा पाडण्याची मात्र यांची हिंमत होत नाही. नुकत्याच काही दिवसापूर्वी रामलल्लाच्या आगमन प्रसंगी मुस्लिम समुदायाने हिंदू समुदायावर केलेला हल्ला लक्षात घेऊन हिंदुत्ववादी नेते, भाजपा आमदार नितेश राणे यांनी सदर भागांमध्ये रॅली काढत तेथील अवैध अतिक्रमणावर बुलडोझर चालवले आणि सर्वत्र खऱ्या अर्थाने आनंद उत्सव साजरा केला. असे असतानाही आजही महाराष्ट्रातील मनपा अधिकारी मात्र अशा अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याची हिंमत मात्र करत नाही. समोरच्यास जुजबी उत्तर देऊन ते मोकळे होतात. याबाबत हिंदू समुदायांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे.
असाच काहीसा प्रकार ट्रॉम्बे (पापलीपडा) येथे भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर च्या संरक्षक भिंतीला लागून अवैध पद्धतीने तीन मजली दारुल उलूम फैजान मदरसा उभा केला आहे. या विषयी आतापर्यंत अनेक रहिवाशांनी तसेच सजग नागरिकांनी तक्रारी करून झालेल्या आहेत. या अनुषंगाने पोलीस उपायुक्त यांनी सदर बाब महानगरपालिकेकडे पाठवून अनधिकृत बांधकामाद्वारा राष्ट्रीय संस्थेच्या सुरक्षेला धोका असल्याबाबत विचारणा केली होती.
सदरील पत्रास उत्तर देताना डीएमसी हर्षद काळे यांनी असे नमूद केले आहे की, मी स्वतः एम/पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यासोबत १३/९/२०२३ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आहे. येथे सूचित करण्यात येते की, भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर कंपाऊंड बाजा लागून अनेक निवासी झोपड्या आहेत. त्यामध्ये शेकडो रहिवासी राहतात. तेथे मदरसा आहे. बीएआरसीने हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच मदरशाची तपासणी केल्यावर असे लक्षात आले की, तिथे सुद्धा खासगी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. सदरील बांधकामावर कारवाई केल्यास धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. इतर अवैध बांधकामांवर कारवाई केल्यास परिसरात असलेल्या रहिवाशांना बेघर व्हावे लागेल. म्हणजेच थोडक्यात सीसीटीव्ही लावले असल्यामुळे सदरील तीन मजली वास्तु हे कायदेशीर ठरते असेच म्हणावे लागेल.
बीएआरसी ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यत संवेदनशील ठिकाण आहे. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून कुठल्याही प्रकारचा घात अपघात घडल्यास लाखो लोकांना जीवाला मुकावे लागू शकते. असे असताना सुद्धा डीएमसी हर्षद काळे यांनी सदरील अवैध बांधकामास संरक्षण देण्यामागचे नेमके कारण तरी काय? याची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.