Sunday, August 10, 2025

IND vs ENG, 3rd Test: भारतीय संघाला मोठा झटका, तिसऱ्या कसोटीतून हा खेळाडू बाहेर

IND vs ENG, 3rd Test: भारतीय संघाला मोठा झटका, तिसऱ्या कसोटीतून हा खेळाडू बाहेर

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी आणखी एक झटका बसला आहे. हा झटका स्टार प्लेयर केएल राहुलने दिला आहे. दुखापतीशी झुंजणारा राहुल तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलला संघात सामील केले जाऊ शकेत.


भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या ५ कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. केएल राहुलने पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. पहिल्या कसोटीदरम्यान राहुलने दुखापतीची तक्रार केली होती. यानंतर तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला होता. आता तिसऱ्या कसोटीतही तो खेळू शकणार नाही.


नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्ध या मालिकेच्या शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आपल्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यात विराट कोहलीचे नाव नव्हते. त्याने खाजगी कारणांसाठी ब्रेक घेतला.


बीसीसीआयने स्पष्ट म्हटले होते की राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. त्यांना फिटनेस सिद्ध करावा लागेल तेव्हाच ते सामने खेळू शकतील. चौथ्या कसोटीत ते खेळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.



फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही राहुल


तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे सर्वाधिक खेळाडू १२ फेब्रुवारीला राजकोट पोहोचतील आणि त्यांनी ट्रेनिंग सुरू केले. १३ फेब्रुवारीला सराव सत्र राहील. सूत्रांच्या मते राहुल फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सिलेक्टर्सना सांगितले की राहुलला कमीत कमी एक आठवडा निगराणीखाली राहावे लागेल.

Comments
Add Comment