
मुंबई: फेब्रुवारीमधील हा आठवडा म्हणजे प्रेमाचा आठवडा मानला जातो. हा आठवडा जोडप्यांसाठी खास असतो. रोज डे पासून ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत कपल्स हा आठवडा सेलिब्रेट करता. आज हग डे आहे आणि आज आम्ही तुम्हाला मिठी मारण्याचे फायदे सांगणार आहोत.
मिठी मारल्याने शरीरात काय बदल होतात. तसेच त्याचे शरीरावर काय परिणाम होतात. एखाद्याला मिठी मारल्याने समोरच्याबद्दल आपलेपणा वाढतो इतकंच नव्हे तर तुमच्या शरीरात अनेक प्रकारचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
मिठी मारल्याने शरीरात होतात हे बदल
मिठी मारल्याने आनंदाचे हार्मोन ऑक्सिटोसिन रिलीज होण्यास मदत होते यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे ठोकेही नॉर्मल होतात. यामुळे वागण्यात बदल होतो तसेच भांडणानंतर मिठी मारल्याने रुसवेफुगवेही दूर होतात. तसेच अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.
जेव्हा जोडपे एकमेकांसोबत भांडतात तेव्हा मानसिक ताण निर्माण होतो यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. मिठी मारणे या सर्व तणावापासून सुटका देते. अनेकदा आजारी असताना आपल्या जोडीदाराला मिठी मारल्याने आरोग्य लवक सुधारते. जेव्हा तुम्ही मिठी मारता तेव्हा शरीर अनेक प्रकारचे हार्मोन्स आत सोडले जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या दु:खात असता तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला मिठी मारल्यास एक मनात आनंदाची जाणीव येते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती खूप जवळची असते अशावेळीस त्याने मिठी मारल्यास आपण आपले दु:ख विसरतो.