संगमनेर (सहदेव जाधव) – गमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे वारकारी संप्रदायातील महिला किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत यांचा गावातील काही लोकांनी जाणून बुजून रस्ता अडविला होता. यामुळे अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतात व घराकडे जाण्याचा मार्ग बंद होता.
पिंपळगाव देपा येथील काही लोकांनी त्यांना हकनाक त्रास देत त्यांच्या शेतावर जाणारा रस्ता अडविला होता. या रस्त्यावर चर खोदून व रस्त्यावर माती टाकून हा रस्ता जाणून बुजून अडविण्यात आला होता. या अडबंगपणाला कंटाळून किर्तनकार महिलेने संगमनेर तहसीलदार यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.
अखेर सर्व चौकशी करुन संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी अर्जदार किर्तनकार महिलेला न्याय मिळवून दिला आहे. यावेळी तहसीलदार व महसूल पथकाने स्वतः उपस्थित राहत या महिलेचा रस्ता पुन्हा पुर्ववत करुन दिला आहे. तसेच यापुढे या रस्त्यावर अटकाव न करण्याचा आदेश दिला आहे.
यावेळी किर्तनकार ह भ प रोहिणी राऊत या अतिशय भावनिक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी तहसीलदार धीरज मांजरे, मंडल अधिकारी खाडे साहेब, तलाठी शिरोळे आप्पा, घारगांव पोलीसांचे तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले आहेत.