Poems : काव्यरंग

रविवारच्या दिवशी...


रविवारच्या दिवशी
आम्ही असतो घरी
बिच्चारी आई
वैतागून जाते भारी...

झोप नाही संपत
सूर्य डोकावला तरी
ब्रश करण्यासाठी
आई कुरकुर करी...

टी.व्ही. पाहात पाहात
चालू असतो होमवर्क
पेपरमधील कोडी सोडविताना
बाबा होतात गर्क...

वह्या पुस्तकांनी
भरते नुसते घर
बाबांच्या पेपरची
त्यात पडते भर...

दुपारी मित्रासंगे
मैदानी जमे मेळ
सायंकाळपर्यंत चाले
क्रिकेटचा खेळ...

रविवारच्या दिवशी
मज्जाच मज्जा
रविवार वाटतो जणू
वारांचा राजा...

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ.

बाप...


बोलतात सगळे बापावर
फार कमी लिहिलं जातं बापावर...
स्तुती करण्यास शब्दच नाहीत
बाप एक चैतन्य मूर्ती आहे...

कोणालाही न दिसणार धीर आहे
बाप एक आधार आहे...
सताड उघडे राहिलेले दार आहे
बाप भीतीच्या अंधारतला दिवा आहे...
बाप तळपत्या उन्हातली
हवेची झुळूक आहे...
बाप नाही लुसलुशीत साय
तो दुधातला अस्सल खमंग स्वाद आहे...

आईचे डोळ प्रेमाचे अश्रू
अन् बापाचे डोळे विश्वासाचे दवबिंदू आहे...

आई झुळझूळ
वाहणारी नदी,
बाप खोल शांत
वाहणारा झरा आहे...
राग खोटा त्याचा
अंतरिचा भाव मात्र अगदी
खरा आहे...

- अपर्णा तांबे
Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.