Madhubala : आईए मेहेरबाँ...

  148


  • हलकं-फुलकं : राजश्री वटे


१४ फेब्रुवारी मधुबालाचा वाढदिवस... मधाळ... मधाळ... मधाळ... मधुबाला!!!
पाहाताच ती बाला,
कलेजा खलास झाला...
वो भी एक दौर था, कभी भी न भुलनेवाला...



जेव्हा ही सौंदर्यसम्राज्ञी कृष्णधवल पडद्यावर अवतरायची... फक्त... तिला आणि तिलाच बघतच राहायचं! तिचं खट्याळ हसू, ते मिश्कील डोळे, कपाळावरच्या अवखळ बटांची तिच्या गालाशी सलगी, त्या आडून तिचे बोलके कटाक्ष... अहाहा!!



झुळझुळत्या शिफॉन साडीमधून तिचं पडद्यावर भिरभिरणं... त्यातलं देखणेपण वेगळंच!! किशोरकुमार बरोबरचा तिचा नटखटपणा गुदगुल्या करतो पडद्यावर बघताना...



‘हाल कैसा है जनाब का...’ गाण्यातला तिचा मस्तीभरा अंदाज व धबधब्यासारखं हसणं... म्हणजे एक तरफ सारी कायनात... दुसरी तरफ तूही तू!!



‘महल’मधील तुझा गुढ अंदाज... ‘आएगा आएगा आएगा... आनेवाला आएगा...’ हृदयाची धडकन वाढवतो!



‘आइए मेहेरबाँ...’ ऐकताना तिची नशा नाही चढली तरच नवल... तिच्या मादक डोळ्यांनी घायाळ होतात आजही सिनेरसिक... ओठांची एक कड वर उचलून तुझं हास्य फेकण्याची अनोखी अदा... क...मा...ल आहेस तू!



‘मोहे पनघट पे नंदलाल...’ कमरेला हळुवार झटके देत राधा होऊन तुझं मिरवणं... ‘प्यार किया तो डरना क्या...’ असं बेधडक विचारण्याची कातिल अदा... बिनधास्त!



तुझा प्रेमाचा बहर पेलताना भारी वाटतं फार... तुझे रुसवे फुगवे... त्यावरही दिल कुर्बान....



‘अच्छा जी मै हारी, चलो मान जाओ ना’... देवानंद संगे तुझे लटके झटके... नटखटपणाचा कळस!
मधुबाला, तुला सौंदर्याचं वरदान होतं... तुझ्या आयुष्यात कितीतरी प्रेमपुजारी आशेवर होते...



‘तेरी मेहफील मे किस्मत आजमां कर हम भी देखेंगे!’
तिचं धमकावणंसुद्धा हवंहवंसं...
‘सुनिये... मि. चालबाज बनिये ना बडे तिरंदाज...’
तुझे किती सौंदर्याविष्कार जीवाला वेड लावून गेले...



तुझे गजल कहूं किसी झील की... या शेर किसी गालिब का!
क्या क्या कहूं की बस... अल्फाज धुंडता फिरू...
नजरे टीकी है हुस्न की परी को निहारते हुए!!
कोई पुछे इश्कवालोंसे... हाल कैसा है जनाबका!



स्वत:च्या मनाला तुझं विचारणं,
‘ए दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया हैं...’
पलट के जवाब मिल गया इस हसीना को...
‘ये क्या कर डाला तुने, दिल तेरा हो गया...’ ओय... होय... खल्लास!
घुंगराच्या तालावर तुझं ठेका धरत ठुमकणं...
‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ लाडिक तक्रार तुझी! पावसाळ्या रात्रीत तुझं भिजणं... बिजलीसारखं चमकणं...



‘जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात’...
अन् तुझ्या ओलेत्या सौंदर्याचा अाविष्कार... ‘एक लडकी भिगी भागी सी’... नजरा घायाळ! प्रेम... म्हणजे प्रेम असतं...



तू पडद्यावर प्रेमाची अनेक रूपं साकारलीस... पाहणाऱ्यांना वेड लावलं अक्षरश:... मधुबाला नावाचं जीतंजागतं स्वप्न होतीस तू... आहेस तू... असणार तू !! तुझं देखणं सौंदर्य लवकर अंतर्धान पावलं...
‘मोहब्बत की झुठी कहानी पे रोये...’ असं उसासे टाकत तुझं निघन जाणं... तू मनातून मिटूच शकत नाहीस...



चिरकाल आहेस तू हृदयात प्रत्येकाच्या...
‘सिनेमे सुलगते हैं अरमां...आँखो में उदासी छायी हैं...
१४ फेब्रुवारी मधुबालाचा जन्मदिवस, प्रेमींमध्ये ‘व्हलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो!!

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,