मुंबई: ड्रायफ्रुट्स(dryfruits) शरीरासाठी खूप हेल्दी असतात. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुके प्रत्येक ड्रायफ्रुटचे आपले फायदे असतात. तुम्हाला जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल की सर्वात स्वस्त असलेले मनुक्याने असंख्य फायदे आहेत. फायद्यामध्ये हे बदाम, काजूपेक्षाही वरचढ आहे.
मनुक्याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनचा स्तर वाढण्यास तसेच अॅनिमिया रोखण्यास मदत होते. कारण हा आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी झाल्यास अॅनिमिया होण्याची भीती असते.
मनुक्याच्या सेवनाने वजनही कमी होते. यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म वेगाने होण्यास मदत होते. मनुक्यांमुळे ब्लड प्रेशर आणि रक्तातील साखर कमी होऊन हृदयरोगाची जोखीम कमी होण्यास मदत होते.
मनुक्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट, हायपरपिंगमेंटेशन आणि काळे डाग कमी होतात. यामुळे त्वचेचे तारूणय टिकून राहते. याशिवाय एक समान स्किन टोन मिळवण्यासाठीही मदत होते.