सिडको (प्रतिनिधी) : बनावट सोने बँकेकडे तारण ठेवून सोन्याच्या बदल्यात कर्ज घेत घेऊन बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहक तसेच व्हॅल्युअर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक भूषण दत्तात्रय गांगुर्डे (वय ३३ रा. पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२३ रोजी सिडको येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेमध्ये मध्ये संशयित स्वप्निल रामदास दुसाने (रा. जुने सिडको) याने बँकेचे गोल्ड व्हॅल्यूआर सुभाष दंडगव्हाळ यांच्याशी फौजदारी पात्र संगनमत, हातमिळवणी करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून बँके करून ५ लाख २ हजार ६२१ रुपयांचे गोल्ड लोन मंजूर करून घेतले.
तसेच बँकेची आर्थिक फसवणूक केली याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित स्वप्निल दुसाने व सुभाष दंडगव्हाळ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा अंबड पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल दुसाने याचे देखील चुंचाळे परिसरात ज्वेलर्स दुकान आहे. याप्रकरणी पुढील तपास शेवाळे करीत आहेत .