मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या(sourav ganguly) मोबाईल फोनची चोरी झाली आहे. गांगुलीने याची तक्रार ठाकूरपूर पोलीस ठाण्यात केली आहे. अनेक रिपोर्टमध्ये सांगितले की चोरी झालेल्या फोनची किंमत तब्बल १.६ लाख इतकी आहे. कोलकातामधील गांगुलीच्या घरातून हा फोन चोरीला गेला आहे.
आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट डायरेक्टर गांगुली यांचा फोन गायब झाल्याने ते खूप चिंतित आहेत. कारण त्या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाच्या माहिती आहेत. यामुळे त्यांचा भीती सतावत आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुलीने पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
पोलीस करणार तपास
सौरव गांगुलीच्या घरात सध्या रंगकाम चालू आहे. गांगुलीच्या घरात काम करणाऱ्या कामगारांकडे ही चौकशी होण्याची शक्यता आहे. गांगुलीने शनिवारी ठाकूरपूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी यांना पत्र लिहित सांगितले की मोबाईल फोन त्यांच्या घरातून चोरी झाला आहे.
आयपीएलमध्ये दिसणार गांगुली
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यावेळेस दिल्ली कॅपिटल्ससोबत आहेत. गांगुलीसहित दिल्ली कॅपिटल्सच्या नजरा ऋषभ पंतवर टिकून आहेत. तो या हंगामात उपलब्ध असेल की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे.