Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडी

गर्दीत अचानक घुसला दुधाचा टँकर, ३ जणांचा मृत्यू

गर्दीत अचानक घुसला दुधाचा टँकर, ३ जणांचा मृत्यू

गंगटोक: सिक्कीमच्या(sikkim) गंगटोकमध्ये मोठा अपघात झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गंगटोकच्या रानीपोल भागात घडली. येथे एका जत्रेत अचानक दुधाचा टँकर घुसला. यामुळे जागीत तीन जणांचा मृत्यू झाला. या भयानक दुर्घटनेत ३०हून जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साधारण ७ वाजून १३ मिनिटांनी सिक्कीमच्या रानीपूल येथे तंबला खेळत असलेल्या जत्रेत ही दुर्घटना घडली. रानीपूरच्या टाट मैदानात लोक एकत्र जमले होते. या जत्रेतील मैदानात लोक तंबला खेळत होते. जत्रेत अचानक सिक्कीम मिल्क युनियनच्या गाडीने दोन-चार कारला टक्कर दिली आणि थेट गर्दीत घुसली.

यामुळे गाडीखाली चिरडून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे प्राथमिक कारण मिल्क व्हॅनचे ब्रेक फेल सांगितले जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वेगाने धावणाऱ्या या व्हॅनने लोकांना धडक दिली.

या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा चिरडून मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments
Add Comment