Monday, June 16, 2025

Nitesh Rane : शरद पवारांच्या कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करायला लागेल!

Nitesh Rane : शरद पवारांच्या कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करायला लागेल!

नितेश राणे यांचा संजय राऊतांना इशारा


मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, एखाद्या गाडी खाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खालच्या पातळीवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “कुत्रे तुम्ही आहात. दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात" असं संजय राऊत म्हणाले. यावर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


नितेश राणे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठाऊक!... उबाठातील आपसी गँगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नसबंदी करायला लागेल!" असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे.





राज्यभरात लागोपाठ घडलेल्या खुनांच्या घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीकास्त्र उपसल्याने राज्याच्या राजकारणात आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment