
छातीत दुखू लागल्याने केलं भरती
कोलकाता : बॉलिवूडमधील (Bollywood actor) प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणात सक्रिय असलेले मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना कोलकाता येथील रुग्णालयात (Kolkata Hospital) दाखल करण्यात आलं आहे. मिथुन यांना ब्रेनस्ट्रोक (Brainstroke) झाल्याने त्यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालय दाखल करण्यात आलं, असं म्हटलं जात आहे.
आज सकाळी अचानक मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागले. अशातच त्यांना अस्वस्थताही जाणवत होती. त्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजून मिथुन यांच्या हेल्थबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.
मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, 'हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे'.
मिथुन हे विविध कार्यक्रम तसेच चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सारेगमप या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून मिथुन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मिथुन यांचा मुलगा नमाशीनं मिथुन यांच्यासाठी खास मेसेज पाठवला होता तो मेसेज पाहिल्यानंतर मिथुन भावूक झाले. मिथुन चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. तरी देखील मिथुन हे त्यांच्या डान्स आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकतात.