Balu More Firing Case : तीन दिवसांपूर्वी गोळीबार झालेल्या भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कार्यालयात घुसून ५ जणांनी केला होता अंदाधुंद गोळीबार


जळगाव : राज्यात सध्या सर्रास गोळीबार (Firing case) करत हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीच्या अनेक खळबळजक घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधून (Chalisgaon) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. भाजपचे चाळीसगाव येथील नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांच्या कार्यालयात घुसून ५ जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर बाळू मोरे यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


जळगावच्या चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. अज्ञात तरुण चेहऱ्याला मास्क लावून आले होते. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर बाळू मोरे यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शरद मोहेळ, महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या