यामी-आदित्य लवकरच होणार आईबाबा
मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम (Yami Gautam). तिने केलेल्या चित्रपटांपेक्षा तिच्या ब्युटी प्रोडक्टसच्या जाहिरातींमुळे (Beauty products ads) ती विशेष प्रसिद्ध आहे. यामीचा नवा ‘आर्टिकल ३७०’ (Article 370) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काल ट्रेलर लाँच (Trailer launch) सोहळा पार पडला. या सोहळ्यात यामीचा पती आदित्य धरने (Aditya Dhar) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. यामी आणि आदित्य लवकरच आईबाबा होणार असल्याची त्याने घोषणा केली.
आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान यामी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. या सोहळ्यावेळी आदित्य म्हणाला, यामी आई होणार आहे, लवकरच आमच्या घरी बाळ येणार आहे. आदित्यने ही गुडन्यूज दिल्यानंतर यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामी आणि आदित्य यांच्यावर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदित्यने दिग्दर्शित केलेल्या उरी या चित्रपटात यामीने काम केलं. यामी गौतमने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या विक्की डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामी गौतमचा ओएमजी २ हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला.