Wednesday, July 9, 2025

JCB चा रंग पिवळा का असतो, लाल अथवा सफेद का नाही? तुम्हाला हे माहीत आहे का?

JCB चा रंग पिवळा का असतो, लाल अथवा सफेद का नाही? तुम्हाला हे माहीत आहे का?

मुंबई: देशातील अनेक राज्यांमध्ये अवैध इमारती तसेच बांधकामे पाडण्यासाठी एका खास मशीनचा वापर केला जातो. लोग त्याला जेसीबी मशीन म्हणतात. पिवळ्या रंगाची ही मशीन इतकी मोठी असते की काही वेळातच मोठमोठ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात. तर कन्स्ट्रक्शन साईटवरही जेसीबी मशीनचा वापर खोदण्यासाठीही केला जातो.


इमारती पाडण्यासाठी दुसऱ्या ज्या मशीनचा वापर केला जातो त्याला बुलडोझर म्हणतात. बुलडोझरचा वापर रस्त्याच्या निर्मितीसाठी केला जातो मात्र खास बाब म्हणजे याचा रंगही जेसीबीप्रमाणेच पिवळा असतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की जेसीबी मशीन आणि बुलडोझरचा रंग पिवळा का असतो?


सध्याच्या काळात जेसीबी मशीन आणि बुलडोझरचा रंग पिवळाच असतो. मात्र कधीकाळी याचा रंग लाल आणि सफेद होता. मात्र काही खास कारणे लक्षात घेता याचा रंग पिवळा करण्यात आला. कंपनीने मशीनची मागणी वाढत असताना मशीनचा रंग बदलण्यास सुरूवात केली होती.


जेव्हा लाल आणि सफेद रंगाचे जेसीबी कंन्स्ट्रक्शन साईटवर काम करत होती तेव्हा दूरवरून पाहण्यास त्रास होत होता. रात्रीच्या वेळेस लाल-सफेद रंगाच्या मशीन्स दिसत नव्हत्या. त्यानंतर कंपन्यांनी जेसीबी मशीनचा रंग पिवळा केला. यामुळे दूरवर या दिसू शकत होत्या. पिवळ्या रंगामुळे रात्रीच्या वेळेसही या मशीन दिसत होत्या.


खरंतर या मशीनचे नाव जेसीबी नाही. जेसीबी हे मशीन बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. हे बनवणारी कंपनी जोसेफ सिरिल बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेडची स्थापना १९४५मध्ये जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी केली होती. कंपनीचे नावच आता मशीनचे नाव बनले आहे.


ज्याला आपण जेसीबी मशीन म्हणतो त्याचे खरे नाव बॅकहो लोडर आहे. भारत, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये जेसीबी शब्दाचा वापर यांत्रिकपणे खोदण्यासाठी केला जातो.

Comments
Add Comment