नाशिक : सकल हिंदू समाज नाशिक, आयोजित येत्या रविवारी (दि. ११ फेब्रुवारी) रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘लॅण्ड जिहाद’ वक्फ बोर्ड रद्द व्हावा या विरोधात नाशिक येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘अब फिर एक बार हिंदुओकी हुंकार’ची घोषणा घेऊन रविवारी सायंकाळी ४ वाजता बिडी भालेकर मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहरा सह जिल्ह्यात अवैद्य प्रार्थनास्थळे, भूमी जिहाद आदी विरोधात हा मोर्चा असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस विभागातर्फे देखील चोख असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि सदर मोर्चात प्रमुख वक्ते म्हणू. हिंदुत्वादी आमदार नितेश राणे, पत्रकार संपादक सुदर्शन चॅनलचे मालक सुरेश जी चव्हाणके, प्रखर हिंदुत्वादी वक्ता ओळख असलेले काजल दीदी हिंदुस्तानी हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तसेच धार्मिकस्थळे हिंदूंवर होणारे हल्ले तसेच भद्रकाली वडाळा परिसरात वाढत असलेली वस्ती या संदर्भात देखील वक्त्यांकडून समाचार घेतला जाणार असल्याचे बोलले जाते आहे. तसेच मिळालेल्या माहिती नुसार शहरात जिल्ह्यात बैठकीचे आयोजन, शहरात वस्ती,पाढे, कॉलनी येथे निरोप देणे हे सूक्ष्म पद्धतीने नियोजन चालू असल्याचे बोलले जाते आहे. सदर मोर्चात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…