Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीHealth Tips: तुम्ही लाल मिरचीचे सेवन अधिक करता का? तर हे घ्या...

Health Tips: तुम्ही लाल मिरचीचे सेवन अधिक करता का? तर हे घ्या जाणून

मुंबई: भाजी, आमटीमध्ये जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लाल मिरची पावडरचा वापर करत असाल तर सांभाळा कारण यामुळे शरीरास मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकते.अनेकांना गोड पदार्थ खाण्याऐवजी तिखट तसेच चटपटीत खायला आवडते. यामुळे ते सतत आपल्या पदार्थांमध्ये लाल मिरची पावडरचा वापर करत असतात.

अनेकांना तर तिखटाशिवाय जेवणच जात नाही. मात्र अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडून ऐकले असेल की लाल मिरचीचा वापर अधिक करू नका यामुळे शरीरास हानी पोहोचू शकते. लाल मिरची पावडर जगभरातील अनेक रेसिपीजमध्ये वापरली जाते.

मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडरचे सेवन केल्याने पोटात अल्सर तसेच गॅस्ट्राइटिसारख्या पाचनसंबंधी समस्या निर्माण होतात. लाल मिरची पावडरमधील कॅप्साईन हा घटक पोटाला त्रासदायक ठरू शकतो. यामुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते.

यामुळेच अधिक प्रमाणात तिखट न खाण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडर खल्ल्याने शरीरात सूज वाढू शकते जे हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांशी संबंधित असतात.

लाल मिरची पावडरच्या अत्याधिक सेवनाने अॅसिड रिफ्लक्सही होऊ शकतो. सोबतच काही व्यक्तींना अस्थमाचाही अटॅक येऊ शकतो. तसेच त्वचेच्या संपर्कात लाल मिरची पावडर आल्यास यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणाही येऊ शकतो. याशिवाय लाल मिरची पावडरच्या निमित सेवनाने पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -