Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीघरातही शॉर्ट्स घालू शकत नव्हते, ईशा देओलने लग्नानंतर केला होता खुलासा

घरातही शॉर्ट्स घालू शकत नव्हते, ईशा देओलने लग्नानंतर केला होता खुलासा

मुंबई: इशा देओल आणि भरत तख्तानी हे लग्नाच्या १२ वर्षांनी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. नुकतेच एक विधान करून या अभिनेत्रीने आपल्या घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला. यातच अभिनेत्रीचा जुन्हा इंटरव्ह्यूही व्हायरल होत आहे. यात त्यांनी सांगितले होते की लग्नानंतर ती शॉर्ट्स घालू शकत नव्हती.

बॉलिवूड अभिनेत्री आणि देओल कुटुंबाची लाडकी लेक इशा देओलचे आपल्या पतीसोबतच्या घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या तेव्हापासून त्यांच्या लग्नाशी संबंधित किस्सेही समोर येऊ लागले. सध्या अभिनेत्रीचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. यावेळेस अभिनेत्रीने आपल्या सासरच्या वातावरणाबद्दल खुलेपणाने सांगितले होते. तसेच भरत तख्तानीसोबत लग्न केल्यावर तिचे आयुष्य कसे पूर्णपणे बदलून गेले होते हे ही सांगितले होते.

पुस्तकाच्या माध्यमातून केला होता मोठा खुलासा

खरंतर, इशा देओलने आपल्या जीवनाशी संबंधित पुस्तकही लाँच केले होते. याचे नाव अम्मा मिया. तिने आपल्या या पुस्तकात सांगितले होते की २०१२मध्ये जेव्हा त्यांनी लग्न केले होते तेव्हा त्यांच्या आयुष्यात खूप बदल आले होते. इशाने सांगितले की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल म्हणजे मी घरात शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून फिरू शकत नव्हते. जसे मी लग्नाच्या आधी करत होते.

सासरच्यांबद्दल म्हणाली असं काही…

इशाने या दरम्यान सासरच्यांबद्दलही लिहिले होते. सासरचे सर्व लोक तिच्याशी चांगले वागतात. तेथील लेडीज आपल्या पतीसाठी स्वत: जेवण तयार करतात. मात्र सासरच्या लोकांनी मला कधी किचनमध्ये येऊ दिलं नाही. उलट माझी सासू म्हणते की मी त्यांच्या घरातील तिसरा मुलगा आहे. त्यांनी कधीही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. मोठी सून असल्याकारणाने खूप प्रेम मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -