Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीBharat Ratna: बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, राज ठाकरेंची मागणी

Bharat Ratna: बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, राज ठाकरेंची मागणी

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न(Bharat Ratna) देण्यात यावा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. राज ठाकरेंनी पीव्ही नरसिंहराव, एमएस स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न देण्याच्या घोषणेचे यावेळी स्वागत केले.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट लिहित ही मागणी केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की…

माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.

बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.

 

देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा.

स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.

असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -