Thursday, July 25, 2024
Homeक्राईमKasammal died : दाक्षिणात्य अभिनेत्रीची हत्या! दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानेच...

Kasammal died : दाक्षिणात्य अभिनेत्रीची हत्या! दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानेच घेतला आईचा जीव

तामिळनाडूतील धक्कादायक प्रकाराने मनोरंजनसृष्टी हळहळली…

चेन्नई : तामिळनाडूमधून (Tamilnadu) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारुसाठी पैसे देत नसल्याच्या वादावरुन मुलानेच आईची हत्या केली. विशेष बाब म्हणजे, हत्या झालेली महिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Indian Film industry) अभिनेत्री होती. कासम्माल (Kasammal) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ती ७१ वर्षांची होती. विजय सेतुपतिसारख्या (Vijay Sethupathi) प्रसिद्ध अभिनेत्यासोबत तिने चित्रपटांमधून काम केले होते. तिच्या अशा दुर्दैवी निधनामुळे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

तामिळनाडूतील मदुरे शहराजवळील उसिलामपट्टी येथे ४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. कासम्माल यांचा मुलगा नमकोदीला (P Namakodi) दारुचे व्यसन होते. दारुला पैसे नसल्यामुळे नमकोदीने (वय ५२ वर्षे) कासम्माल यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांच्यात भांडणं सुरु झाली. त्याचवेळी त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. नमकोदी आईला मरेपर्यंत मारहाण करत होता. लाकडाच्या साहाय्याने नमकोदीने आईला मारहाण केली होती. दुर्दैवाने, ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:०० वाजता तिला मारहाण झाल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी नमकोदीला अटक केली असून त्याच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून पत्नीपासून दुरावलेला नमकोदी कासम्मलसोबतच राहत होता. नमकोदी हा नेहमीच दारुसाठी कासम्माल यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. मात्र, त्या दिवशी हे भांडण टोकाला जाऊन त्याने रागाच्या भरात आपल्या आईचीच हत्या केली.

कासम्माल यांच्याविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी तमिळ चित्रपट ‘Kadaisi Vivasayi’ यामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. तो चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात विजय सेतुपति आणि योगी बाबू यांची महत्वाची भूमिका होती. एम मनिकंदानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये कासम्माल यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -