
मुंबई: राज्यात इयत्ता चौथी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. याबाबतच्या सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुलांच्या झोपेबाबत चिंता व्यक्त करत शाळांच्या वेळा बदलण्यात यावा असे राज्यपालांनी सूचना दिल्या होत्या.
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत विचारविनिमय सुरू होता. मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी प्राथमिक शाळा सकाळी ७ वाजता सुरू होत असता. मात्र यामुळे लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत होता. मुलांची नीट झोप न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात विनाअनुदानित, अनुदानित, सरकारी आणि खाजगी अशा मिळून एकूण १,१०,११४ शाळा आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ६५ हजाराहून अधिक शाळांमध्ये होऊ शकते.