Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रदेशमहत्वाची बातमी

Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून 'या' नेत्यांची नावे पोहोचली दिल्लीत!

Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून 'या' नेत्यांची नावे पोहोचली दिल्लीत!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचाही समावेश


कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ?


मुंबई : लोकसभा निवडणुकींसाठी (Loksabha Election) राजकीय पक्ष (Political Parties) कामाला लागले असतानाच राज्यसभा निवडणुकाही (Rajyasabha Election) समोर येऊन ठाकल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या (Mahayuti) वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येणार आहेत.


भाजपकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.


भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे (Narayan Rane), विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ (Chitra Wagh), हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावे आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment