Tuesday, May 13, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: जेवण जेवल्यानंतर चुकूनही खाऊ नका फळ नाहीतर...

Health: जेवण जेवल्यानंतर चुकूनही खाऊ नका फळ नाहीतर...

मुंबई: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डाएटची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. एक परफेक्ट डाएटमध्ये फळ अतिशय गरजेचे असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे जेवणानंतर लगेचच फळ खाणे चांगले नसते. खासकरून आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीराला अतिशय नुकसान होऊ शकते. यामुळे जेवणानंतर लिंबू, संत्रे,द्राक्षे खाऊ नयेत.



होऊ शकतात समस्या


पचनासंबंधित आजार


जेवण जेवल्यानंतर खेळ खाल्ल्यात पोटात जडपणा, गॅस तसेच अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. अनेकजण जेवल्यावर फळ खातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा त्रास होतो.



पोषण मिळण्यास अडथळा


जेवण जेवल्यांनंतर फळ खाल्ल्यास शरीरास योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. आंबट फळांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. जर जेवण जेवल्यानंतर फळ खात असाल तर पोषकतत्वांचे ठीक पचन होत नाही. यामुळो रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.



अॅसिडिटीचा त्रास


जेवणानंतर लगेचच आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोटात अॅसिड बनण्यास सुरूवात होते. यामुळे बैचेनी, अपचन तसेच छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment