Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीVideo: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून स्वत:लाही गोळ्या घालून संपवले

Video: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून स्वत:लाही गोळ्या घालून संपवले

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाला आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःलाही गोळी घालून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसरमध्ये ही थरकाप उडवणारी घटना घडली. अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिसचे काम होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -