मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी तयार आहेत. न्यूज एजन्सीच्या बातमीनुसार विराट कोहलीचा मित्र आणि द. आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबीडेविलियर्सने याचा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने इंग्ंलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्याआधीच खाजगी कारणांचा हवाला देत सुरूवातीच्या दोन सामन्यातून सुट्टी घेतली होती. बीसीसीआयने याची माहिती देताना मीडिया आणि चाहत्यांच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा सन्मान करण्याचा आग्रहही केला होता.
एबी डेविलियर्सचा खुलासा
एबी डेविलियर्सने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यांचे दुसरे बाळ येणार आहे. हा कुटुंबाचा वेळ आहे आणि काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटते अधिकतर लोकांची प्राथमिकता आपले कुटुंब आहे. यासाठी तुम्ही विराटला जज करू शकत नाही.
AB De Villiers said, “Virat Kohli and Anushka Sharma are expecting their 2nd child, so Virat is spending time with his family”. (AB YT). pic.twitter.com/qurRKnFK1q
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 3, 2024
विराट-अनुष्काचे मौन
दरम्यान, विराट-अनुष्काने या प्रकऱणावर अद्याप मौन बाळगणे पसंत केले आहे. दोघांनी पहिल्या बाळाच्या आगमनाची बातमी आनंदाने सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र दुसऱ्या बाळाबाबत त्यांनी मौन पाळणे योग्य ठरवले आहे.
२०१७मध्ये विराट आणि अनुष्का यांचे इटलीमध्ये लग्न पार पडले होते. त्यानंतर ११ जानेवरी २०२१मध्ये ते मुलीचे आई-बाबा बनले होते. विराट-अनुष्काच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे.