Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

NCP MLA disqualification : निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

NCP MLA disqualification : निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

१४ फेब्रुवारीला राहुल नार्वेकर करणार सुनावणी


मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लावत मूळ पक्ष व घड्याळाचं चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) बहाल केलं. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) प्रचंड मोठा धक्का बसला. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या प्रकरणी निकाल लावणार आहेत. ते सुद्धा अजितदादांच्या बाजूनेच निकाल लावतील, अशा चर्चा होत असताना राहुल नार्वेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्रे मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.



१४ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर १४ फेब्रुवारी रोजी निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Comments
Add Comment