Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणMahayuti in Konkan : भराडी देवीचे आशीर्वाद घेत कोकणात महायुतीच्या सभांचा धडाका

Mahayuti in Konkan : भराडी देवीचे आशीर्वाद घेत कोकणात महायुतीच्या सभांचा धडाका

उद्धव ठाकरेंच्या टीकांचा समाचार घेणार महायुती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष (Political Parties) कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीची (Mahayuti) ताकद वाढत असल्याचे चित्र आहे, तर महाविकास आघाडी (MVA) मात्र दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. भाजपची (BJP) साथ दिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाचा (NCP symbol) ताबा मिळाल्याने तर महायुती अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे आपला प्रभाव राज्यव्यापी करण्याचा महायुतीचा मानस आहे. त्यातूनच आता महायुती कोकण दौऱ्याचे (Konkan visit) आयोजन करणार आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच कोकण दौरा केला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप आणि महायुतीवर प्रचंड टीका केली. त्यांच्या याच टीकांना प्रत्युत्तर देण्याकरता आता महायुती सज्ज आहे. भराडी देवीचे आशीर्वाद घेऊन महायुतीच्या कोकणातील सभांना सुरुवात होणार आहे.

कोकणात जाहीर सभा घेऊन महायुती उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाच्या काळात कोकणात काय काय कामे केली याचा सर्व लेखाजोखा मांडणार आहे. त्यांनी कोकणाकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केलं, याची माहिती आता कोकणी जनतेपर्यंत महायुतीचे नेते पोहोचवणार आहेत. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून सरकार कसं कोकणी जनतेच्या मागे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्नही महायुती करणार आहे. लवकरच या दौऱ्यांची तारीख निश्चित केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -