Sunday, August 31, 2025

देशात वर्षाला १ कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्सपेयर्सच्या संख्येत वाढ

देशात वर्षाला १ कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्सपेयर्सच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली: भारतात वर्षाला एक कोटी रूपयाहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्सपेयर्सच्या(taxpaIyers) संख्येत चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. ही संख्ये असेसमेंट वर्ष २०२३-२४मध्ये २.१६ लाखापर्यंत पोहोचली आहे. अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती दिली. अर्थ राज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ नंतर महत्त्वपूर्ण वाढीसह मोठी कमाई करणाऱ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंड पाहायला मिळत आहे.

स्वतंत्र इन्कम टॅक्स कलेक्शनमध्ये साल दर साल २७.६ टक्के वाढ

स्वतंत्र इन्कम टॅक्स कलेक्शनमध्ये साल दर साल २७.६ टक्के वाढ पाहायला मिळाली आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी याचे श्रेय टॅक्स रिफॉर्म आणि देशाची आर्थिक विकासाच्या चांगल्या गतीला दिले आहे. तसेच प्रोफेशन इनकम रिपोर्टिंगमध्येही वाढ पाहायला मिळाल्याचे संसदेत सांगण्यात आले.

दरवर्षी १ कोटीहून अधिक पगार घेणाऱ्या टॅक्सपर्यंसची संख्या वाढली आहे. अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत बजेट सत्रादरम्यान सांगितले, नव्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वर्ष २०२३-२४ साठी ही संख्या २.१६ लाखाहून अधिक झाली आहे.

देशात आयकर रिटर्न देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की साल दर साल आधारवर देशात आयकर रिटर्न देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. यातील एक कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या टॅक्स पेयर्सचा आकडा मोठ्या गतीने वाढत आहे. हा आकडा असेसमेंट वर्ष २०१९-२० मध्ये १.०९ लाख कोटी रूपये इतका होता. तर २०२२-२३मध्ये ही संख्या १.८७ लाखावर पोहोचली.

२६ ऑक्टोबर २०२३ च्या आकडेवारीनुसार सध्याचे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ७.४१ कोटी टॅक्सपेयर्सने आयकर रिटर्न दाखल केला. यात ५३ लाख असे टॅक्सपेयर्स आहेत ज्यांनी पहिल्यांदा इन्कम टॅक्स दाखल केला.

Comments
Add Comment