Thursday, June 19, 2025

चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर गोळीबार, मारेकरी फरार

चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर गोळीबार, मारेकरी फरार
चाळीसगाव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव(chalisgaon) येथे गोळीबार झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी ७ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्तीय भाग असलेले रेल्वे स्टेशन परिसरात माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केले, सुमारे तीन ते चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

त्यातील एक गोळी पायाला दुसरी पोटाजवळ आणि तिसरी छातीत लागली असून यात ते गंभीर जखमी झाल्याची बातमी हाती येत आहे, उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर गोळीबार करणारे मारेकरी चारचाकी कार मधून फरार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

या घटनेने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे, वाहनाचा शोध घेणे सुरू झाले आहे, हा गोळीबार कुठे, कसा, का, कुणावर, कोणत्या वाहनाचा वापर करण्यात आला याचा तपास आता पोलिस करत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा