मुंबई: 12th Fail स्टारर विक्रांत मेसीच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र सुरू आहे. अभिनेत्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे. विक्रांत आधीच आपल्या सिनेमाच्या यशाने अतिशय खुश आहे. यातच अभिनेत्यासाठी आणखी एक खुशखबर आली आहे. विक्रांत लग्नाच्या २ वर्षांनी बाबा बनला आहे. त्याची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
विक्रांत मेसी बनला बाबा
विक्रांत मेसी आणि शीतल यांनी आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागताची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी तारीख दिली आहे. तसेच यात त्यांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती दिली.
आईबाबा बनल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव
विक्रांतच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या पोस्टवर अभिनेत्री राशी खन्नाने कमेंट करत लिहिले - Congratulations Massey's. अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नाच्या २ वर्षांनी बनले आई-बाबा
विक्रांत मैसीने शीतल ठाकूरसोबत २०२२मध्ये १४ फेब्रुवारीला लग्न केले होते. हे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडले होते. विक्रांतच्या लग्नाचे सोशल मीडियावर समोर आले होते. फोटोमध्ये विक्रांत आणि मैसी खूप क्यूट दिसत होते.
१२वी फेल सिनेमाला मिळाले पुरस्कार
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास विक्रांत मेसी १२वी फेल सिनेमात दिसला होता. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या. यातील विक्रांतच्या कामाचे कौतुक सर्वत्र झाले. १२वी फेल सिनेमाला फिल्मफेअरचा बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांना बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला.