Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीथंडीत वजन वाढते आहे तर हे ५ पदार्थ जरूर करा ट्राय, रहाल...

थंडीत वजन वाढते आहे तर हे ५ पदार्थ जरूर करा ट्राय, रहाल फिट

मुंबई: थंडीमध्ये तुम्ही पाहिले असेल की बऱ्याच जणांचे वजन वाढते. याची अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे थंडीमध्ये अनेकांना अंथरूण घेऊन लोळत राहावेसे वाटते. यामुळे ना जिमला जाणे होत ना रनिंग. एक्सरसाईजही कमी होते. यामुळे फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते.

थंडीच्या दिवसात हेवी डाएट घेतला जातो. यात फॅट, प्रोटीन, कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. लोक या काळात आलू पराठे, गाजरचा हलवा, नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकेल. मात्र खाण्यातील कॅलरीजचा परिणाम आपल्या पोट आणि कमरेवर दिसू लागतो.

अशातच हे ५ पदार्थ ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुम्ही फिट आणि अॅक्टिव्ह राहू शकता.

डाळिंब

डाळिंब अतिशय पौष्टिक फळ आहे.यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. यात अँटी ऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळते. डाळिंबाचा रस शरीरात रक्त वाढवण्यासाठी तसेच बॉडीला एनर्जी देण्याचा जबरदस्त स्त्रोत आहे. यात फॅट बर्न कऱणारेही गुण असतात. हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता अथवा फ्रुट सलाड म्हणूनही सेवन करू शकता.

आंबट फळे

थंडीच्या दिवसांत आंबट फळे खाण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. जे इम्युन बूस्ट करण्याचे काम करतात. तसेच वजन घटवण्यात फायदेशीर असतात. दररोजच्या डाएटमध्ये संत्रे, मोसंबी, ग्रेपफ्रुटसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

केल

हिरव्या पालेभाज्यांमध्ये केल सर्वात फायदेशीर मानले जाते. याचा वापर साधारणपणे सलाडच्या रूपात केला जातो. यात व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि लो कॅलरी असते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत होते.

अक्रोड

अक्रोड हे एक जबरदस्त ड्रायफ्रुट आहे. हे एक हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबरसारखे न्यूट्रिएंट याचा मोठा स्त्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट असतात. थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासोबतच वजन मेंटेन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

आले

आल्याचा वापर साधारणपणे मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. आल्यामध्ये मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासोबतच वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे डायजेशन चांगले होते तसेच सूजही कमी होण्यास मदत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -