Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीEsha Deol: ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट, लग्नाच्या १२ वर्षांनी...

Esha Deol: ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट, लग्नाच्या १२ वर्षांनी झाले वेगळे

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि त्यांचे पती भरत तख्तानी यांच्यातील मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच इशा आणि भकत या दोघांनी संयुक्त विधान करत वेगळे होण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

त्यांनी आपल्या विधानात म्हटले की, आपापासातील सहमतीने आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील हे बदल आमच्या मुलांसाठी काय योग्य आहे याचे महत्त्व आहे. आमच्या प्रायव्हसीची काळजी घेतल्यास आम्ही याचा सन्मान करू.

काही दिवसांपासूनच बॉलिवूडमध्ये ईशा देओल आणि भरत तख्तानी वेगळे होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही असा दावा केला जात होता की इशा आणि भरत तख्तानी यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही दीर्घकाळापासून कोणत्याही इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नव्हते.

१२ वर्ष पूर्ण होण्याआधीच झाले वेगळे

नुकतीच लग्नाच्या १२ वर्षांनी इशा देओल आणि पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाची घोषणा झाली आहे. एका संयुक्त विधानात या जोडप्यांनी याची घोषणा केली.

जूनमध्ये साजरा केला होता ११वा वाढदिवस

ईशा आणि भारत यांना ६ वर्षांची मुलगी राध्या आणि ४ वर्षांचा मुलगा मिराया आहे. इशा आणि भरतचे लग्न २०१२मध्ये झाले होते. दीर्घकाळापासून त्यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे चित्र होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -