Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीAmruta Fadnavis : देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे...

Amruta Fadnavis : देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण!

अमृता फडणवीस यांच्या जबरदस्त उखाण्याने विरोधकांना बसला चाप

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओज आणि गाणी सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. त्यातच आता नागपुरातील (Nagpur) ‘विकासाचं वाण’ या हळदी कुंकू कार्यक्रमात (Haldi kunkum Ceremony) अमृता फडणवीस यांनी घेतलेला जबरदस्त उखाणा (Amruta Fadnavis Ukhana) चर्चेत आला आहे. या उखाण्यातून अमृता फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.

नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून या हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण, आपण सर्वांनी ते स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’ असा उखाणा घेतला. या उखाण्यातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

हळदी-कुंकू कार्यक्रमात गायलं गाणं

‘विकासाचे वाण’ या हळदी कुंकू कार्यक्रमावेळी अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या आग्रहास्तव एक गाणंही गायलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेल्या अनेक योजनांनी महिलांना समाजात सन्मानाने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -