Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीसिडकोतर्फे तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

सिडकोतर्फे तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळातर्फे ७५ व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी महागृहनिर्माण योजना जानेवारी – २०२४ चा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत तळोज्यातील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएलच्या जवळ ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २६ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल २०२४ रोजी काढण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण घटकांतील नागरिकांसाठी ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर म्हणाले.

३,३२२ सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील ६१ व तळोजा नोड येथील २५१ याप्रमाणे ३१२ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत, तर द्रोणागिरी येथील ३७४ व तळोजा येथील २,६३६ याप्रमाणे ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. योजनेच्या ऑनलाइन नोंदणी व सविस्तर माहितीकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी सहाय्यासाठी नागरीकांनी ७०६५४५४४५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -