Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीPaytm : पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली?

Paytm : पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली?

पेटीएमची बँकिंग सर्व्हिस १ मार्चपासून बंद

नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला (paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (reserve bank) मोठा झटका बसला आहे. पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिले आहेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ३१ जानेवारी रोजी आरबीआयने ही कारवाई केली. आरबीआयने नियामांचे उल्लघंन केल्याबद्दल हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली, याची माहिती आता समोर आली आहे.

कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक प्रमुख कारण आहे. कोट्यवधी अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते.

paytmवर रिझर्व्ह बँकेकडून मोठी कारवाई

पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीत, तर फक्त चार कोटी कोणाच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंटसह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीत. यामुळेच पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -