रांची : झारखंडमध्ये आज राजकीयदृष्ट्या सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सादर कऱणार आहे. शक्तीपरीक्षेत सामील होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकारी पक्षांचे एकूण ४० आमदार हैदराबाद येथून रांचीला परतले आहेत.
याआधी सर्व आमदारांना हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. येथून ते रात्री उशिरा रांचीला परतले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही फ्लोर टेस्टमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
झारखंडच्या ८१ सदस्यी विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ इतका आहे. गठबंधनाच्या हिशेबाने पाहिले असता चंपाई सरकारकडून बहुमताच्या या कमीतत कमी अंकापेक्षा पाच आमदार अधिक आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिकामी आहे. यासाठी ८० जागांच्या गणनेनुसार बहुमताचा आकडा ४१ आहे. जेएमएमने दावा केला आहे की त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे आणि फ्लोर टेस्टला त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.
विधानसभेत जेएमएम, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ४६ आमदार आहेत. यात २८ जेएमएमचे, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआयच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.jha
माजी मु्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यावर ही परिस्थिती बनली. यामुळे घाईघाईत चंपाई यांना मुख्यमंत्री बनवावे लागले. याआधी सप्टेंबर २०२२मध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने फ्लोर टेस्टमध्ये आपल्या पक्षातील ४८ मतांसह बहुमत सिद्ध केले होते.