Monday, September 15, 2025

आता फक्त दोन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही!

आता फक्त दोन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही!

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराजांचा मोठा दावा

आळंदी : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांततेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे आम्ही बघणार नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने ही ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी विसरुन जाऊ, असा दावा श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Maharaj) यांनी केला. ते आळंदीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोविंददेव गिरी महाराज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एका कार्यक्रमासाठी ते आळंदीमध्ये उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आणि इतरही सहभागी झाले होते.

याच दरम्यान ते म्हणाले, अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांततेत मिळाली पाहिजेत. त्यानंतर मंदिरांसंबंधित सगळे वाद-विवाद आम्ही बाजूला ठेऊ. आम्हाला तीन ठिकाणच्या वास्तू मिळू द्या, अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारही नाही.

Comments
Add Comment