Monday, August 4, 2025

मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

मुंबई: मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तसेच काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली.


नागपूर जिल्हा परिषदेसमोर मोदी सरकारच्या विकसित भारत ही जाहिरात लावण्यात आली होती. या जाहिरातीवर त्यांनी काळ फासले. या जाहिरातीबाबत संताप व्यक्त करत त्यांनी या जाहिरातीवर काळं फासलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन केले होते. यावेळेस त्यांनी जिल्हा परिषदेसमोर लावलेल्या जाहिरातीवर संताप व्यक्त करत काळे फासले. तसेच जाहिरातीवरील मोदी शब्दावरही छेडछाड केली. या प्रकरणी कुणाल राऊत यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर कुणाल आणि त्यांचे सहकारी बेपत्ता होते. अखेर रविवारी सायंकाळी अटक कऱण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा