Kunal Raut : पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासणार्‍या काँग्रेसच्या कुणाल राऊतविरोधात भाजपचं आंदोलन

काँग्रेसकडूनही मिळाला घरचा आहेर


नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्याविरोधात नागपूर जिल्हा परिषदेसमोर (Nagpur Zilla Parishad) भाजपने जोरदार आंदोलन (BJP Protest) केले. तसेच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो छापण्यात आला होता. हे प्रकरणही या आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरले. दरम्यान, काल कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली.


दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचा प्रकार घडला होता. शिवाय जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसच्या सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का? या भाजप सदस्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेविरोधात कारवाई करण्यात आली होती. आज भाजपने या दोन्ही प्रकरणांना उचलून जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन केले.


नागपूर जिल्हा परिषद म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं दुकान झालं आहे. जिल्हा परिषद बरखास्त करा, अशी मागणी भाजपने केली. जिल्हा परिषदेसमोरच्या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरत भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार केले जात असून जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली.



कुणाल राऊत यांना काँग्रेस पक्षाकडूनच घरचा आहेर


भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याच्या कृतीला आपले समर्थन नसल्याची भूमिका नागपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष काँग्रेस नेत्या कुंदा राऊत म्हणाल्या, 'पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाहीत ते देशाचे आहेत. त्यामुळे ही कृती समर्थनीय नाही.' त्यामुळे याप्रकरणी कुणाल राऊत यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी