साप्ताहिक राशिभविष्य, २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४
![]() |
वातावरण आनंदी, उत्साही राहील मेष : आपणास कामाच्या अनेक संधी येणार आहेत. संधीचा योग्य तो फायदा घ्या. मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक निकाल आपल्या बाजूने लागेल. नोकरीमध्ये पगारवाढीची शक्यता आहे. सुखात वाढ होणार आहे. आरामदायी वस्तूवर खर्च होणार आहे. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. व्यावसायिक प्राप्ती वाढून घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घेणार आहात. भागीदारीमधील लाभ, नोकरीत राजकारण तसेच गटबाजीपासून अलिप्त राहण्यात आपले हित आहे हे लक्षात ठेवा तसेच इतर कोणावरही शेरेबाजी करू नका. नोकरीतून अपेक्षित वार्ता कानी येतील. |
![]() |
भरघोस आर्थिक फायदा वृषभ : आरोग्य चांगले राहून आरोग्याच्या चिंता मिटतील. कुटुंबातील तरुण-तरुणींनी आपल्या संगतीवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. कुसंगत टाळा तसेच मूर्खांच्या नंदनवनात रमू नका. वेळेचा अपव्यय टाळून होणारे नुकसान कमी करता येईल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आघाडी मजबूत राहील. तेजी, मंदी संबंधित व्यवसायात भरघोस आर्थिक फायदा होईल. जुन्या गुंतवणुका फायदेशीर सिद्ध होतील. नवीन गुंतवणूक यशस्वी ठरतील. मात्र नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक कालावधी आहे. काही नवीन फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना तसेच नियोजन सफल होईल. |
![]() |
जीवनात सुवार्ता मिळतील मिथुन : या आठवड्यात एकूण बहुतेक क्षेत्रात प्रगती झालेली दिसेल मात्र प्रयत्नात कमी पडून देऊ नका तसेच इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करा. आळस, चालढकल नको. कुटुंब-परिवारातील उत्साही आनंदी वातावरणाचा लाभ घेता येईल. तरुण-तरुणींना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. काहींचे परिचयोत्तर विवाह निश्चित होतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. नवपरिणीतांना अपत्य योग. व्यवसाय-धंदा-नोकरीत अपेक्षित लाभ मिळतील. जुनी व्यावसायिक येणी वसूल झाल्यामुळे कर्जमुक्तीचे समाधान मिळेल तसेच नवे करार-मदार होतील. आर्थिक सुबत्ता राहिल्याने नव्या गुंतवणूक करावी. काहींना वास्तू योग. |
![]() |
आर्थिक गरज भागेल कर्क : स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष द्या. खाण्या-पिण्यावरील निर्बंध अवश्य पाळा. काही वेळेस मानसिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या घटना निर्माण होऊ शकतात. सतर्क राहणे गरजेचे ठरेल. विशेषतः लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे नितांत गरजेचे असेल. स्थावर मालमत्ता, जमिनीबाबतच्या व्यवहारात यश मिळून आर्थिक फायदा मिळू शकतो. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागू शकते. खर्चात अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल. कुटुंब सदस्यांच्या मागण्या वाढतील. निरनिराळ्या समारंभाची निमंत्रणे मिळतील. व्यवसाय-धंद्यातील आर्थिक गरज भागेल. दीर्घकाळ रखडलेली कार्य पूर्ण करू शकाल. |
![]() |
अविस्मरणीय कालावधी सिंह : शुभ ग्रहमान लाभल्यामुळे हा आठवडा अविस्मरणीय ठरू शकतो. शुभ फळे प्रतिपादित झाल्यामुळे उत्साही आणि आनंदी राहाल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. विवाह करण्यातील अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील. कुटुंबात आनंदी, उत्साही वातावरण लाभेल. आलेली संकटे परस्पर जातील, चिंतामुक्त व्हाल. रोगांवर मात कराल. नोकरी-धंद्यात परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. कुटुंबासाठी खरेदी कराल. समाधान लाभेल. |
![]() |
क्रोधावर नियंत्रण आवश्यक कन्या : कुटुंब-परिवारात वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः कुटुंबातील मुला-मुलींबरोबर वाद-विवाद अथवा मतभेदांची शक्यता तसेच मुला-मुलींनी कुसंगती टाळणे महत्त्वाचे ठरेल नाही. त्या गोष्टी मागे लागून कुटुंबातील शांततेचा भंग होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. प्रेमप्रकरणात जरा जपूनच पुढील पावले उचलणे आवश्यक आहे. व्यवसाय-धंद्यात कलहदृश्य प्रसंग टाळावेत. काही वेळेस सहकार्य मिळण्यात अडचणी येतील. स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. कुटुंबात मंगलकार्याची नांदी होईल. |
![]() |
वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे तूळ : या आठवड्यात आपल्या वागण्यावर तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. नोकरी-व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी लहान-सहान अथवा किरकोळ कारणावरून वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे. त्या वादविवादांच्या रूपांतर कलहसदृश प्रसंगात होऊन नाती कायमची दुखावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंब-परिवारात इतरांच्या मतास उचित प्राधान्य द्या. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यश मिळेल. उच्च शिक्षण घेण्यातील अडथळे दूर होऊन गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. कुटुंबातून मदत मिळू शकते. |
![]() |
यश संपादित करू शकाल वृश्चिक :प्रलोभनांपासून अलिप्त राहा नोकरी – व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यामुळे कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. आपल्या प्रत्येक लहान- मोठ्या निर्णयात आपल्या जीवनसाथीची महत्त्वाची भूमिका असेल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मानाचे योग. बढतीची तसेच वेतनवृद्धीची शक्यता. अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो. मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. त्याचप्रमाणे लहान-मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश लाभेल. |
![]() |
महत्त्वाचे ध्येय गाठाल धनु : सदरील कालावधी सर्वतोपरी शुभंकर म्हणता येईल. आपल्या समोरील महत्त्वाचे ध्येय गाठण्यात यश मिळेल. महत्त्वाची कार्ये पूर्ण करता येतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. विशेषत: मालमत्तेच्या संदर्भातील कार्य पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद – विवाद मिळतील. नोकरी-व्यवसाय-धंद्यातील आलेले संकट दूर होईल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीतील समस्या सुटतील. नवे व्यवसाय, प्रकल्प सुरू करता येतील. महत्त्वाचे करारमदार होतील. कर्ज मंजूर होतील. |
![]() |
शांतपणे निर्णय घ्या मकर : पूर्वार्धात साडेसातीच्या झळा जाणवू शकतात. विशेषतः तरुणांनी शिस्तबद्ध रीतीने वागणे आवश्यक आहे तसेच कटाक्षाने कुसंगत टाळा. ते हिताचे ठरेल. आपले कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका. शॉर्टकट टाळा. एखादा निर्णय घेताना त्याचा पूर्णपणे विचार करूनच शांतपणे निर्णय घ्या. नोकरीत आपले कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवा. वक्तशीर राहा. शिस्त पाळा. कामात चालढकल नको. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या नोकरीत आपल्या अधिकारांच्या कार्यकक्षा ओळखून काम पूर्ण करा. लहान-मोठ्या प्रलोभनांना बळी पडू नका. व्यवसाय धंद्यातील कायदे करून अवश्य पाळा. समस्या उद्भवू शकतात. प्रवास कार्यसिद्ध होतील. |
![]() |
नशिबाची साथ मिळेल कुंभ : या कालावधीत आपल्याला नशिबाची साथ मिळण्याबरोबरच शुभ ग्रहांची साथसंगत लाभल्यामुळे होणाऱ्या कुयोगावर यशस्वी मात करता येईल. नियोजित कार्य वेळेवर पूर्ण होतील. सरकारी स्वरूपाच्या कामात ओळखी मदतीचा उपयोग होईल. दीर्घकाळ रखडलेली कामे गतिमान होतील. वास्तुविषयक कार्य पूर्णत्वाच्या मार्गावर असतील. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी राहून कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विवाहमधील अडचणी समस्या दूर होऊन विवाह निश्चित होतील. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. नोकरीत पदोन्नती, वेतनवृद्धी होऊ शकते. काहींना दैवी प्रचिती. |
![]() |
खर्च वाढू शकतो
मीन : |