Pakistan Election: आधी इम्रान यांची पडली विकेट, आता शाह महमूदही बोल्ड, निवडणूक लढवण्यावर ५ वर्षांची बंदी

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांना सायफर प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घातली आहे. ८ फेब्रुवारीला पाकिस्तानात निवडणूक होत आहे. त्यापूर्वी आयोगाने त्यांच्यावर ही बंदी घातली आहे.


ईसीपीच्या नोटिफिकेशननुसार माजी परराष्ट्र मंत्र्यांना द स्टेट बनाम इम्रान अहमद खान आणि महमूद कुरैशी प्रकरणात विशेष न्यायालयाने ३० जानेवारीला आलेल्या निर्णयाच्या आधारावर अपात्र ठरवले.


३० जानेवारीला अधिकृत गोपनीयता अधिनियमाच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने सायफर प्रकरणार माजी पंतप्रधान इम्रान खन आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी या दोघांना १० वर्षांचा तुरूंगवास सुनावला.



इम्रानच्या पक्षाने सायफर प्रकरणात काय केले विधान?


सायफर प्रकरण हे एक राजकारणाशी संबधित आहे. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफने दावा केला की कागदपत्रांमध्ये इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी संयुक्त राज्य अमेरिकेची धमकी होती.


इम्रान खान आणि शाह महमूद कुरैशी दीर्घकाळापासून आदियाला जेलमध्ये त्यांची केस चालू होती. दोन्ही पीटीआय नेत्यांवर नापाक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सायफरच्या माहितीचा वापर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.

Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट