Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात झळकणार श्रेयस तळपदे आणि गौरी...

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात झळकणार श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले

काय आहे चित्रपटाचे नाव?

मुंबई : काही दिवसांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा (Mild heart attack) आल्याने प्रचंड चर्चेत आलेला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले (Gauri Ingavale) यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे.

गौरी इंगवलेने याआधीही महेश मांजरेकरांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिचा ‘पांघरुण’ हा चित्रपट गाजला होता. शिवाय तिने ‘कुटुंब’ चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती आता ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत याआधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणं औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.” चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -