Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCoastal Road : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला...

Coastal Road : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार लोकार्पण

मुंबई : मुंबईसाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या (Coastal Road) पहिल्या फेजचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वरळी (Worli) ते मरीन ड्राईव्ह (Marine Drive) या १० किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच, १५ मेपर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली.

या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास २९ किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.

सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण ४ किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२,७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे १६०० वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यीकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.

भराव टाकण्यात आलेल्या जागेवर मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक उद्याने आणि ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प प्रस्तावित असतील. शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचे अंतर जिथे एक तास लागतो तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे अवघ्या दहा मिनिटात हे अंतर पार करता येईल.

कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

  • मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे.
  • प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे.
  • एकूण प्रकल्पाचा खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे
  • यामध्ये १५.६६ किमीचे तीन इंटरचेंज आणि २.०७ किमीचे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये ७० टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -