Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिक ग्रामीण पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट

नाशिक ग्रामीण पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. नाशिकचे माजी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केली आहे. ग्रामीण दलात ६ पोलीस निरीक्षक, ७ सहाय्यक निरीक्षक व ५ उपनिरीक्षकांच्या बदल्या शहाजी उमाप यांनी केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या बदलीपूर्वी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती केली, तर राजू सुर्वे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी दिली आहे.

मालेगाव कॅम्पचे दिलीप खेडकर यांची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील दत्तात्रय लांडगे यांची मनमाड पोलीस ठाण्यात, चांदवडचे रवींद्र जाधव यांची मालेगाव कॅम्पला व नियंत्रण कक्षातील श्रद्धा गंधास यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सुनील भाबड, दत्ता चौधरी यांची जिल्हा वाहतूक शाखेत, नव्याने हजर झालेले अरुण धनवडे यांची ओझर पोलीस ठाण्यात, नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांची नांदगाव पोलीस ठाणे, दिलीप राठोड यांची सिन्नर, राकेशसिंह परदेशी यांची दिंडोरी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ यांची लासलगावला, लासलगावचे अशोक मोकळ यांची नियंत्रण कक्षात, विजय सोनवणे यांची निफाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाचक म्हणून नेमणूक झाली आहे. नव्याने हजर झालेले हनुमान उगले यांची सिन्नरला, नांदगाव पोलीस ठाण्यातील कल्याणी पाटील यांची नियंत्रण कक्षात नेमणूक झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -